शनिपेठेत सिलेंडर, इलेक्ट्रिक शेगडीची चोरी; एका विरुद्ध गुन्हा

0

जळगाव;- शहरातील सोनपेठ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घराचे लोखंडी गेट वरून आत प्रवेश करून रिकामे गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक शेगडी आणि ब्लूटूथ स्पीकर चोरून नेल्याप्रकरणी एका विरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की लिलाबाई रामनारायण जोशी (वय 72 )या घरगुती खानावळ चा व्यवसाय करीत असून त्या शनी मंदिर मागे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. संशयित आरोपी ओंकार योगेश सोनवणे रा. रिधुर वाडा शनिपेठ याने लिलाबाई जोशी यांच्या मालकीच्या बंद घरातून लोखंडी गेटचे व भिंतीच्या मधील जागेतून आज प्रवेश करून ८०० रुपये किमतीचे रिकामे सिलेंडर , १५०० रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक शेगडी आणि ४५० रुपये किमतीचा ब्लूटूथ स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद लिलाबाई जोशी यांनी दिल्यावरून शनिपेठ पोलीस स्टेशनला ओंकार सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत देशमुख करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.