असिस्टंट जनरल मॅनेजरची बॅग लांबवली, भामटा पोलिसांच्या जाळ्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वे एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या विभागातील असिस्टंट जनरल मॅनेजरची बॅग गेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान घडला होता. या प्रकरणी कल्याण जीआरपी पॉइलीसानी अजय सरोगे या तरुणाला डोंबिवलीतून अटक केली आहे. असेच त्याच्याकडून बॅगमधील महत्वाच्या वस्तूदेखील हस्तगत केल्या आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेल्वेत एजीएम पदावर कार्यरत असलेले सांकेत कुमार मिश्रा हे ८ नोव्हेंबर रोजी ११०२० कोणार्क एक्सप्रेसमध्ये बोगी नंबर ए-१ मधून प्रवास करीत होते. यावेळी लोणावळा ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान त्यांचा डोळा लागला. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या हातात असलेली बॅग घेऊन पोबारा गेला.

या बॅगमध्ये महागडा लॅपटॉप दोन मोबाईल, दोन हार्ड डिस्क, रायटिंग पॅड आणि रोख रकमेसह अन्य कागदपत्रे होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील, एसीपी आधिनाथ बुधवंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे.

परिसरातील सिसिटिव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी अजय सरोज याला अटक केली आहे. अजय हा डोंबिवलीतील अहिरे गावात राहतो. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अजयच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. तो ट्रेनमध्ये अंटेंडण्ट असल्याचे सांगून फिरायचा आणि चोऱ्या करत असल्याचेही समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.