दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholorship.gov.in वर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विहित मुदत देण्यात आलेली आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती ३० सप्टेंबर सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणी १६ ऑक्टोबरपर्यंत. शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती ३१ ऑक्टोबरपर्यंत सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणी १५ ऑक्टोबरपर्यंत, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती ३१ ऑक्टोबरपर्यंत सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणी १५ नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. असेही त्यांनी कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.