दारूबंदीसाठी महिला सरपंचांनीच दिले पोलिसांना निवेदन…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भुसावळ तालूक्यातील ओझरखेडा गावातील विना परवाना गावठी व विदेशी दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिला सरंपचासह गावातील महिलांनी वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले. दारु बंदी न झाल्यास त्याच्या विरोधात उपोषणाचा इशारा यावेळी सरपंचांनी दिला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, ओझरखेडा गावात ग्रामपंचात तसेच बस स्थानक परिसरात विना परवाना देशी व विदेशी दारू विक्री होते. त्यामुळे परीसरात महिलांना त्या रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे. दारूच्या सर्रास विक्रीने घरात भांडणाचे प्रमाण तर अनेक शाळकरी मुल व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे गावातील दारु विक्री लवकारात लवकर बंद करण्याची मागणी गावातील महिलांनी सह.उप.निरिक्षक परशुराम दळवी यांच्याकडे थेट दारू विक्री करणाऱ्यांच्या नावासह निवेदन दिले. आणि गावातील दारू विक्री बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा महिलावर्गाने यावेळी दिला.

सरपंच संगीता पाटील, सुमन नेमाडे, उषा सरोदे, निलीमा झोपे, नंदा निळे, उज्वला पाटील, सुनिता इंगळे,  वैशाली पाटील, मीना निळे, कल्पना नारखेडे, शोभा इंगळे, विद्या निळे, आणि इतर तीस ते चाळीस महिलांनी स्वाक्षऱ्या केलेले निवेदन यावेळी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.