अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक ; १२ दुचाक्या हस्तगत

0

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क

सावदा पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरलेल्या दुचाकीसह दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिल्या होत्या.त्यानुसार सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह पोहेकॉ उमेश पाटील, विनोद पाटील, संजीव चौधरी, पोना मोहसीन खान पठाण, यशवंत टहाकळे, विनोद तडवी, पोकॉ मनोज तडवी, चालक पोकॉ नामदेव कापडे यांनी नाकाबंदी केली.

या नाकाबंदीच्या कारवाईत जावेद मुबारक तडवी रा. पातोंडा ता.जि. बुरहानपूर हा विना क्रमांकाची दुचाकी घेवून फिरत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी दुचाकी आडवून त्याची चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची कसून चौकशी केली असता सोबत असलेली दुचाकी ही सावदा पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली. त्याचप्रमाणे त्याने त्याचा साथीदार मुनाफ मुबारक तडवी रा. कोळवद, ता. यावल याचे साथीने सावदा, रावेर, चोपडा, नेरी, ता. जामनेर, लालबाग ता.जि. बुरहानपुर, गणपतीनाका बुरहानपुर मध्यप्रदेश येथुन देखील मोटार सायकलींची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्याचा साथीदार मुनाफ मुबारक तडवी रा. कोळवद, ता. यावल असे नाव सांगितले. पोलीसांनी दोघांना अटक केली. दोघांकडून आत्तापर्यंत १२ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्यामार्गदर्शनात पोउनि विनोद खांडबहाले, पोहेकॉ उमेश पाटील, संजीव चौधरी, पोना/मोहसीन खान पठाण, विनोद तडवी व सहकारी करीत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.