Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उद्या होलिका दहन ; जाणून घ्या पूजन विधी, महत्व ..
    ताज्या बातम्या

    उद्या होलिका दहन ; जाणून घ्या पूजन विधी, महत्व ..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण दरवर्षी साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा आहे. यंदा होळीचा हा पवित्र सण 7 आणि 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. म्हणजेच 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला धुलेंडी साजरी केली जाणार आहे. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या अग्नीत आहुती देण्याने जीवनातील नकारात्मकता संपते. यासोबतच कुटुंबात सुख-शांती राहते. तर चला होलिका दहनाची पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व जाणून घेऊया.

    होलिका दहन पूजा साहित्य

    पाण्याची एक वाटी, शेणाच्या माळा, रोळी, अक्षता, उदबत्ती आणि धूप, फुले, कच्चा कापसाचा दोरा, हळदीचा तुकडा, मूग डाळ, बताशा, गुलाल, नारळ, नवीन धान्य.

    होलिका दहन पूजन विधी

    होलिका दहनाच्या रात्री होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची पूजा केली जाते.या दिवशी सर्वप्रथम आद्य उपासक श्रीगणेशाचे स्मरण करुन ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी गंगेचे पाणी शिंपडून शुद्ध करावे.होलिका दहनाचे साहित्य आग्नेय दिशेला ठेवावे.पूजा करताना पूजकाने होलिकाजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे.पूजेसाठी तांब्याच्या भांड्यात पाणी, हार, रोळी, तांदूळ, गंध, फुले, कच्चा कापूस, बताशे-गूळ, अख्खी हळद, गुलाल, नारळ इत्यादींचा वापर करावा.यानंतर होलिकेत शेणापासून बनवलेली खेळणी आणि हार ठेवावा. यासोबतच नवीन पिकाचे धान्य ठेवावे. नंतर कच्चा सूत होलिकाभोवती तीन किंवा सात वेळा गुंडाळावा. यानंतर ‘असृक्पाभयसंत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै:। अतस्त्वां पूजायिष्यामि भूते भूतिप्रदा भव।।’ असा उच्चार करत होलिकेच्या सात प्रदशिक्षा घालाव्या.

    या मंत्रासोबत होलिका अर्घ्य ही द्यावे.चौकात होलिका दहन झाल्यानंतर तेथून आणलेल्या अग्नीने होलिका दहन करावे.नंतर मडक्यातील शुद्ध पाणी आणि इतर सर्व पूजेच्या वस्तू एक एक करून होलिकाला भक्तीभावाने अर्पण कराव्या.होलिका पूजन केल्याने कुटुंबातील सदस्यांना आजारांपासून मुक्ती मिळते, चांगलं आरोग्य लाभतं, असे मानले जाते.होलिका दहन 2023 शुभ मुहूर्त पंचांगानुसार 7 मार्च रोजी होलिका दहन मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांपासून ते 8 वाजून 51 मिनिटापर्यंत आहे. एकूण वेळ 2 तास 27 मिनिट आहे.

     

     

     

     

    #holi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा

    September 9, 2026

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    डिजिटल क्रांती : समृद्ध शेतीचा पाया/ ‘स्मार्ट शेती, भरघोस प्रगती’

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif