माजी राज्यपाल ‘सत्यपाल मलिक’ यांच्या घरावर सीबीआयचा छापा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला, असून सीबीआयने जलविद्युत प्रकल्प प्रकरणी छापा टाकला आहे. यापूर्वी सीबीआय ने वीमा घोटाळा प्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. याआधीही सीबीआयने जम्मू-कश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीय यांच्या घरावर छापे टाकले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाड मधील किरु जलविद्युत प्रकल्पासाठी 2,200 कोटी रुपयांचे नागरि कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2019 मध्ये छापा टाकण्यात आला होता. 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू आणि कश्मीर चे राज्यपाल असलेले मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला गेला आहे.

सीबीआयने यापूर्वी सांगितले होते की वर्ष 2019 मध्ये ‘केरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट’च्या सिव्हिल कामाचे सुमारे 2,200 कोटी रुपयांचे कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात गैरव्यवहार केल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.