सॅटर्डे क्लबच्या उद्योगवारीतील महिलांचे प्रत्येक रिंगण प्रगतीचे – प्रा. डॉ. क्षमा सुबोध

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

वारीतील रिंगण जसे महत्वाचे असते, तसे सॅटर्डे क्लबच्या उद्योग वारीतील महिलांचे प्रत्येक रिंगण प्रगतीचे ठरले आहे असे प्रा.डॉ.क्षमा सुबोध सराफ यांनी प्रतिपादन केले. आयएमआर कॉलेजच्या सभागृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव शाखेतर्फे सन्मान ‘ती’च्या कर्तृत्वाचा या कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रिजन हेड श्रीहर्ष खाडिलकर, जळगाव शाखेचे चेअरमन अभिजीत पाटील, वुमन्स रिजन हेड डॉ.भावना चौधरी, जळगाव वूमन विंग हेड डॉ. वृषाली छापेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात प्राजक्ता कोतवाल,  हेमांगिनी चौधरी, स्वाती महाजन, वर्षा वाणी, सेजल चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर आकांक्षा कुलकर्णी, रश्मी गोखले, डॉ. अमृता पाटील, ज्योती देशपांडे, रुचिरा भोळे, नयना पाटील, डॉ. रेणुका जोशी, राजश्री बक्षी, स्वप्ना कुलकर्णी, डॉ. जयश्री महाजन, रूपाली ठाकूर, सुरेखा सोनार, अक्षरा देशपांडे, स्वाती कुलकर्णी आदींना उद्योग/व्यवसायातील कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी उद्योगवारीतील महिलांनी तूच आहे तुझ्या व्यवसायाची ब्रँड अँबेसिडर हे घोषवाक्य सार्थ करून दाखवले आहे असे सांगितले. श्रीहर्ष खाडीलकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. वृषाली छापेकर यांनी दोन वर्षातील २४ कार्यक्रमांचा सचित्र आढावा सादर केला. प्रास्ताविकात आकांक्षा कुलकर्णी यांनी उद्योगवारी म्हणजे घरगुती व्यवसाय व छोटा उद्योग करणाऱ्या महिलांना सॅटर्डे क्लबने उपलब्ध करून दिलेले हक्काचे व्यासपीठ आहे व रिंगण म्हणजे प्रत्येक महिन्याचा कार्यक्रम असे सांगितले.

प्रारंभी रश्मी गोखले यांनी प्रतिज्ञा सादर केली. सत्कारार्थी हेमांगिनी चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षा वाणी यांनी काव्यात्मक पद्धतीने कार्यपरिचय व्यक्त करीत भावना व्यक्त केल्या. स्वाती महाजन यांनी प्राणिक हीलिंग या विषयी माहिती दिली.

सूत्रसंचालन अक्षरा देशपांडे व स्वाती कुलकर्णी यांनी तर परिचय रूपाली ठाकूर व डॉ.जयश्री महाजन यांनी करून दिला. आभार डॉ. भावना चौधरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सॅटर्डे क्लब जळगावचे सचिव दिनेश थोरात, अभिजीत वाठ, सचिन दुनाखे, उमेश पाटील, राजेश चौधरी, डॉ. दीपक पाटील, राजेश यावलकर, ॲड.निखिल कुलकर्णी, जयेश पाटील, विनोद चौव्हाण, निखिल जाधव, निलेश शेटे, कुणाल महाजन, रोहन चौधरी, राहुल चौधरी यांच्यासह सदस्य व सत्कारार्थी महिलांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.