सप्तशृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सप्तशृंगी गड साडेतीन शक्तीपीठ पैकी अर्धपीठ आहे. सप्तशृंगी गडावर मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. जर तुम्ही देखील गडावर जात असाल तर ही बातमी नक्की वाचा. भाविकांच्या सोयीसाठी रोपवे तयार करण्यात आलेला आहे. मंदिरात जाण्यासाठी असलेला हा फ्युनिक्युलर रोपवे दोन दिवस बंद राहणार आहे. यामुळे भाविकांना दोन दिवस पायऱ्या चढून गडावर देवीच्या दर्शनाला जावे लागणार आहे.

या गडावर येणाऱ्या भाविकांसाठी २०१८ मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या फ्युनिक्युलर रोपवेमुळे भाविकांना लवकर दर्शनासाठी गडावर जात येणे शक्य होत असते. सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणारे वृद्ध, दिव्यांग, महिला, रुग्ण भाविक, तसेच लहान मुलांना सहजपणे दर्शन घेण्याची सशुल्क सुविधा प्राप्त झाली आहे.

मंदिरात जलद जाता- येता यावे, या दृष्टीने भाविक रोपवेचा वापर अधिक प्रमाणात करत असतात. दरम्यान, १३ व १४ सप्टेंबर असे दोन दिवस रोपवेच्या पूर्व नियोजित तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी रोपवे बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसात भाविकांना पायऱ्यानीच वर चढावे लागणार आहे. मात्र शुक्रवार (१५ सप्टेंबर) रोपवेची सेवा पूर्ववत केली जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.