वाळू माफियांना तात्काळ अटक करा, यावल कोतवाल संघटनेची मागणी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेलवड ता. बोदवड येथील कोतवाल यांचे वर दि. 12/09/2023 रोजी अवैध गौणखनिज माफियांकडून झालेल्या प्राणघातक हल्ला व जिवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपींना तात्काळ अटक व त्यांचे विरुध्द एम.पी.डी.ए. अतंगत कठोर करवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन यावल तालुका कोतवाल संघटनेकडून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले आहे .

जळगाव जिल्हयात व महाराष्ट्रात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीस आळा बसविणे कामी कोतवाल कर्मचारी नेहमी आपले कर्तव्य चोखपणे बजवित असतात. त्यातच अलीकडच्या काळात बामणोद मंडळ अधिकारी बबीता चौधरी, रावेर परिविक्षाधीन तहसिलदार यांचेवर गौणखनिज माफीयांनी हल्ले केले.  त्याच प्रमाणे दिनांक 12/09/2023 रोजी बोदवड तालुक्याचे तहसिलदार यांच्यावर अवैध गौणखनिज वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडून शेलवड ता. बोदवड येथील कोतवाल गजानन सुभाष अहिरे यांचे ताब्यात देऊन सदरचे वाहन बोदवड तहसिल कार्यालयात पुढील कार्यवाही करीता जमा करणे बाबत सुचना दिल्यात.

त्यानंतर तहसिलदार हे पुढील कार्यवाही करीता रवाना झाले त्यानंतर कोतवाल श्री. गजानन अहिरे आपले कर्तव्य चोखपणे बजवीत असतांना सदर अवैध गौणखनिज वाहतुक करणारे ट्रक्टर मालक, चालक व इतरांनी कोतवाल गजानन सुभाष अहिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ट्रक्टरसह पसार झाले. आरोपी विरुध्द बोदवड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हेतील अरोपीना तात्काळ दिनांक 13/09/2023 पर्यंत अटक झाली पाहिजे तसेच त्यांचे विरुध्द एम.पी.डी.ए. अर्तगत गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई  करून त्यांना तात्काळ अटक करावी त्यांचे विरुध्द कारवाई न झाल्यास दिनांक 14/09/2023 पासुन तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचारी हे कामबंद आंदोलन करणार आहे.

तसेच अवैध गौणखनिज माफीयांकडुन होत असलेल्या हल्यामुळे कोतवाल कर्मचारी यांना सरंक्षण दिले पाहिजे. गजानन अहिरे, कुटुंबातील सदस्य व तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचारी हे झालेल्या घटनेमुळे अतिशय घाबरलेले असुन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी कोतवाल संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावरती तालुका अध्यक्ष विशाल राजपूत, उपाध्यक्ष जयश्री कोळी, सचिव ओंकार सपकाळे, प्रशांत सरोदे, धनराज महाजन, निलेश गायकवाड, सोनू सिंग राजपूत, सागर तायडे, सागर साळवे, विजय आढाळे, विकास सोळंके आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.