जळगाव ;– संस्कार भारती जळगाव समिती (देवगिरी प्रांत) तर्फे जळगाव शहरातील गंधे सभागृहात आज सायंकाळी राम रंगी पाडवा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. संस्कार भारतीच्या सा कला या विमुक्तये हे ध्येय साकारत संगीत, नृत्य, नाटक, कीर्तन, चित्रकला आदी कलांचा सामूहिक आविष्कार येथे बघायला मिळाला.
यावेळी जेष्ठ व्यक्ती रजनीकांतजी कोठारी देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. या नंतर श्री राम श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भवभय दारूनम, चैतन्याचे पर्व हे आले, पायोजी मेने राम रतन धन पायो ह्या नववर्ष गीतासह श्रीराम व शबरी मातेची कथा किर्तनाद्वारे सविस्तर मांडण्यात आली. यावेळी श्रीराम जय राम जय जय राम चा गजर करण्यात आला.
दरम्यान चित्रकार सचिन मुसळे, निखिल बोरसे, संपदा घुले, अनिल पाटील ह्यांनी प्रभू श्री रामाचे चित्र साकारले. यामुळे संपूर्ण परिसर राममय झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा देशमुख, हर्षा पाठक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दुष्यंत जोशी, फडणवीस सर, महाले सर, दिलीप चौधरी, निळकंठ कासार, अनिल पाटील, रमा करजगावकर, विशाखा देशमुख, सुचेता नेवे, अनिता निवाने, राजश्री धर्माधिकारी, स्वाती देशमुख, मंदा वाणी, सविता पारमार्थि, आसावरीताई, गीता रावतोले, रावतोळे सर, दिलीप पाटील, श्री चंद्रात्रे, गौरव मेहता, प्रमोद जोशी, संपदा चांदोरकर, शरदचंद्र छापेकर, मोहन रावतोळे, पुरुषोत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, आशा जोशी, भागवत पाटील, ज्योती पाटील, भूषण खैरणार, चिंतामणी पाटील, विशाखा जोशी, रश्मी कुरमभट्टी, मिलिंद देशमुख, पियुष रावळ, वैदेही नाखरे आदींनी मेहनत घेतली. यावेळी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.