रेल्वेचा धक्का लागल्याने वरणगावातील तरुण ठार

0

वरणगाव ;- शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा रेल्वेगाडीचा जोरदार फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १० बुधवार रोजी सकाळच्या सुमारास घडली

पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) दि ९ मंगळवारच्या रात्री घरात कोणास काही नसगाता घरातून बाहेर पडला होता बराच वेळ झाला तरी घरी परत आला नसल्याने घराच्या नातेवाईकांनी त्याला शोधले मात्र दिसुन आला नाही रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर सकाळच्या सुमारास जात असताना वरणगाव रेल्वे स्टेशनच्या थोड्याच अंतरावर रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळला या बाबत लोहमार्ग पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.