Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»ठाकरेंची शिवसेना असली, खोटे तुमचा कपाळमोक्षी !
    राजकारण

    ठाकरेंची शिवसेना असली, खोटे तुमचा कपाळमोक्षी !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हेच खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जे डुप्लिकेट पक्ष दिले आहेत, त्यांचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष नकली असून ते महाराष्ट्राचे काय हित करणार, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील जाहीर सभेतून केली. उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे पक्ष अर्धे होते आता दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केले, असा टोलाही अमित शहा यांनी हाणला. दरम्यान, अमित शहा यांच्या या टीकेचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

    महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हेच खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जे डुप्लिकेट पक्ष दिले आहेत, त्यांचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अमित शहा यांनी जे विधान केले ते आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. असली कोण आणि नकली कोण? हे अमित शहा ठरवू शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे जर नकली शिवसेनेचे प्रमुख आहेत, तर 2019 साली तुम्ही त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर का आला होता? असा सवालही संजय राऊत यांनी अमित शहांना विचारला आहे.

    कपाळमोक्ष होणार !

    आता तुम्ही शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे खोटे गोटे गळ्यात अडकून फिरत आहात, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट पक्षाचा निकाल जनताच लावेल, असेही राऊतांनी सांगितले आहे.

     

    Amit shah Sanjay Raut Sanjay Raut On Amit Shah
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif