तुम्ही किती रोख रक्कम घेऊन प्रवास करु शकता ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यातील मतदान दि. 19 एप्रिलला तर निवडणुकांचा निकाल हा 4 जूनला जाहिर होणार आहे. निवडणुकांमुळे देशभरात आचारसंहिता लागू आहे. अशावेळी नेत्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना देखील काही नियम लागू करण्यात येतात.

अवघ्या पंधरा दिवसांतच निवडणूक अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी देशाच्या विविध भागांतून ड्रग्ज आणि दारुसह कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच आचारसंहिता सुरु असताना तुम्ही किती रोख रक्कम, दागिने किंवा दारु घेऊन प्रवास करु शकता याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवडणुकीदरम्यान, तुमच्याकडे 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख किंवा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू असल्यास तुम्हाला त्याची कागदपत्रे दाखवावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही बिल किंवा बँक स्टेटेमेंट्स दाखवले नाही तर रक्कम जप्त केली जाऊ शकते. जर तुम्ही व्यवसाय किंवा इतर काही करत असाल तर त्या रक्कमेची अधिकृत नोंद असणे गरजेचे आहे. ज्यामुळे अधिकाऱ्याची चौकशी केली तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

जप्त केलेली रक्कम परत मिळेल का?

जप्त केलेली रक्कम परत मिळते. तपासादरम्यान तुम्ही अधिकाऱ्यांना योग्य ती कागदपत्रे दाखवून रक्कम परत मिळू शकते. निवडणुकीच्या काळात दारुचे वितरण रोखण्यासाठी दारुची वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची औषधे, भेटवस्तू आणि दारु बाळगणे बेकायदेशीर मानले जाते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.