संजय राऊत; सरकारला देशाचा इतिहास मिटवायचा आहे, वाचा सविस्तर

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजधानी नवी दिल्लीत (Delhi) ‘नेहरू मेमोरियल म्यूजझियम अँड लायब्ररीच्या’ नावात बदल करून ते पीएम म्युझियम अँड लायब्ररी असे कारणात आले आहे. या संग्रहालयाच्या नामांतराचा निर्णय भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या नामांतराच्या मुद्यावरून सध्या राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
“या संग्रहालयात इतर पंतप्रधानांना स्टेषन मिळायला हवे. अनेक पंतप्रधानांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामध्ये अटलजी (Atalji), इंदिरा गांधी (Indira Gandhi), लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri), यांचा समावेश आहे. त्यामुळे या संग्रहालयामध्ये इतर पंतप्रधानांच्या कामाविषयी सुद्धा माहिती मिळायला हवी, पण त्याचे नाव बदलण्याची काहीही एक गरज नाही” असं राऊत माध्यमांशी बोलतांना म्हणाले. पुढे संजय राऊत म्हणाले कि ” पंडित नेहरूंनी देशासाठी महत्वाचे योगदान दिले आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यात देखील आपले योगदान दिले आहे. त्यांच्याच नावावर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु पीएम म्युझियम असं नाव करता आलं असतं, पण सरकारला देशाचा इतिहास मिटवायचा आहे. ज्यांनी आपला देश घडवण्यासाठी योगदान दिलं त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येत आहे.” तसेच पंडित नेहरुंबद्दल असलेल्या द्वेषामुळे हे कृत्य करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.