संजय राऊतांना दिलासा नाहीच, दिवाळी कोठडीतच ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खासदार संजय राऊत (MP sanjay Raut) हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl Case) न्यालयीन कोठडीत आहेत. यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने जून महिन्यात अटक केली. तेव्हापासून राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. आज राऊत यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाकडून आजही त्यांना दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे. 21 ऑक्टोबरला राऊत यांना दिलासा न मिळाल्यास त्यांना कोठडीतच दिवाळी (Diwali) साजरी करावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.