झाले स्पष्ट; भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आशिया चषक 2023 खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे. तसे, शाह यांनी असेही सांगितले की भारतीय संघ आशिया चषक सामना तटस्थ ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे. 2023 आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे, याआधी भारतीय संघ 2023 मध्ये आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतो असे समोर आले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मंगळवारी मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय पुढील वर्षी होणारी स्पर्धा हलवण्याचा विचार करेल, बीसीसीआयचे सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्याची ऑफर दिली जाईल आणि आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे आम्ही ठरवले आहे.”

आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.