सॅनिटरी नॅपकिनमुळे कॅन्सर ?, असे निवडा योग्य पॅड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मासिक पाळी दरम्यान महिलांनी आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये स्वछता राखण्यासाठी डॉक्टर सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचा सल्ला देतात. तर आजकाल बाजारात अनेक रंगीबेरंगी पॅकेट्समध्ये सीलबंद सॅनिटरी पॅड्स मिळतात. जर तुम्हीही हे पॅड न तपासता खरेदी करत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे. कारण भारतात बनवलेल्या सुप्रसिद्ध कंपन्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्समुळे कर्करोगासारखे प्राणघातक आजार होऊ शकतात, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे की, अनेक कंपन्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मितीमध्ये धोकादायक रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे कर्करोगासोबतच महिलांना वंध्यत्वही येऊ शकते. तसेच ही रसायने मधुमेह आणि हृदयविकारालाही कारणीभूत आहेत.

संशोधनातील बाबी

दिल्लीस्थित एनजीओ टॉक्सिक्स लिंकने आयोजित केलेला हा अभ्यास आंतरराष्ट्रीय प्रदूषण निर्मूलन नेटवर्कच्या चाचणीचा एक भाग आहे, ज्यामध्ये भारतात विकल्या जाणार्‍या 10 ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासादरम्यान संशोधकांना सर्व नमुन्यांमध्ये (phthalates) आणि (volatile organic compounds) चे अंश आढळले. हे दोन्ही दूषित घटक कर्करोगाच्या पेशी निर्माण करण्यास सक्षम आहेत ही चिंतेची बाब आहे. हे संशोधन ‘मेन्स्ट्रुअल वेस्ट 2022’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या चुका टाळा

मासिक पाळीत दर चार ते पाच तासांनी पॅड बदला. दिवसभर एकच पॅड वापरू नका. पॅड बदलताना तुमची योनी देखील पाण्याने स्वच्छ करा. योग्य सॅनिटरी पॅडसह योग्य अंडरवेअर वापरणे देखील महत्त्वाचे आहे. विशेषत: मासिक पाळी दरम्यान कॉटन पॅन्टी निवडा कारण त्यात हवा सहज जाते. तसेच मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी पेन किलरसारखी औषधे वापरू नका, तर गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.

असे निवडा योग्य पॅड

आजकाल ब्रँडच्या लोकप्रियतेवर पॅड निवडले जातात. मात्र पॅड खरेदी करतांना आरोग्याच्या दृष्टीने विचारायला हवा.

सेंद्रिय सॅनिटरी पॅड निवडा: भारतात बनवलेल्या मोठ्या कंपन्यांच्या सॅनिटरी पॅडमध्येही घातक रसायने असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच महिलांनी केवळ रसायनमुक्त सेंद्रिय सॅनिटरी पॅड खरेदी करायला पाहिजे. आजकाल बाजारात अनेक कंपन्यांचे ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत, जे बायोडिग्रेडेबल असल्याने पर्यावरणासाठीही चांगले आहेत. तसेच तुम्ही कॉटनचे सॅनिटरी पॅड देखील वापरू शकता. कधीही वरचे पॅकेट पाहून पॅड खरेदी करू नका, त्यामध्ये दिलेली माहिती वाचून योग्य पॅड निवडा.

सिंथेटिक पॅड  टाळा: सॅनिटरी पॅड खरेदी करताना सिंथेटिक पॅड वापरणे टाळा कारण त्यांचा कठोर आणि रासायनिक आधार योनीच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक आहे. तुमच्या रक्तप्रवाहावर आधारित पॅड निवडा. नेहमी पुरळ नसलेले सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.