गोंडगाव राष्ट्रनिर्माण धर्म सोहळयाची जय्यत तयारी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री. श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गोंडगाव ता. भडगाव जि. जळगाव (खान्देश) येथे होणाऱ्या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा व जनार्दन स्वामी बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरण दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२२ पर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे. तसेच कै. विजकुमार सुदर्शन आहिरे यांचे संकल्पप्रती बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरणाचा श्री क्षेत्र गोंडगाव ता. भडगाव जिल्हा जळगाव ला प्रथमच सौभाग्य प्राप्त झाले आहे. या राष्ट्र निर्माण धर्म सोहळयाची जय्यत तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती आयोजन समितीच्या प्रमुखांनी दि. २३ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरण महाराष्ट्रात श्री क्षेत्र वेरूळ, श्री क्षेत्र ओझर, श्री क्षेत्र पुणतांबा व श्री क्षेत्र गोंडगाव आश्रमात मोठ्या उत्साहात साकार होणार आहे. या चारही ठिकाणी राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा २०२२ या नावाने संपन्न होणार आहे. या सोहळ्यात पुरुष व महिला जपानुष्ठान, एकनाथी भागवत पारायण, ३३ कुंडी यज्ञ, अखंड नामजप, प्रत्येक तालुक्याचे अखंड नंदादीप, हस्तलिखित जप साधना, कीर्तन सप्ताह इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या धर्म सोहळ्याला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त होणार असून जळगाव, धुळे, नंदुरबार, सोयगाव (औरंगाबाद) यांसह अन्य भागातील लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याची महिती बोलताना जिल्हा सेवक संजय पाटील, धर्म राष्ट्र निर्माण धर्म सोहळ्याचे मुख्य कमेटीचे अध्यक्ष डॉ. गणेश अहिरे, सह उपाध्यक्ष समाधान पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सोहळ्यासाठी कुंडी यज्ञ सभामंडपाचे राजस्थान येथील कामगारांनी भव्य दिव्य असा पारंपारिक पद्धतीने यज्ञ कुंड सभा मंडप, भव्य मंडप उभारला आहे. यात दि. २८ नोव्हेंबर ते ५ जानेवारीपर्यंत पहाटे ४:३० वाजता अभिषेक, पहाटे ५ वाजता- विधी सत्संग, आरती, सकाळी ११ व दुपारी ४ वाजता विधिपाठ व सत्संग, सायंकाळी ७ वाजता विधी आरती सत्संग असा दैनंदिन दिनक्रम असणार आहे.

देव देश धर्माच्या रक्षणासाठी व हिंदू धर्माचे पालन आचरण झाले पाहिजे, उन्नती ते राष्ट्र कल्याण व आजचा बालक उद्याचा राष्ट्र चालक आहे, युवकांना व्यसना पासून दूर ठेवणे, योग्य संस्कार, शिक्षण देऊन हिंदू धर्माचे पालन आचरण करण्याची गरज आहे. चांगलं धार्मिक व व्यसन मुक्त निरोगी समाज राष्ट्र निर्माण धर्म सोहळ्यातून घडणार असल्याचे आयोजनकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.