वरणगाव ते सप्तशृंगी गडाकडे पादयात्रा मार्गस्थ

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आयुध निर्माणी वसाहतीतील सप्तशृंगी माता मंदिर आयोजित नांदुरीगड पदयात्रा दि. २४ नोव्हेंबर गुरुवार रोजी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाली.

आयुध निर्माणी वसाहत मधील रहिवाशी तुळशीराम भोलाणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी सप्तशृंगी माता देवीच्या गडावर पायदळ यात्रेचे आयोजन करण्यात येते, मात्र मागच्या काळात त्यांचे निधन झाल्यानंतर यात्रेची पंरपरा खंडीत न होता यंदाही भक्तांनी मोठ्या उत्साहात पादयात्र काढून असंख्य भाविकांसह नांदुरी गडाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

पदयात्रेचे हे २९ वे वर्ष असून सुरुवातीस शहरातील भवानी मातेच्या मंदिरात दास बाबा भोलाणे यांच्या हस्ते पुजा व अभिषेक केल्यानंतर टाळ मृदुग व टाळ  गजरात पंचकृषीतील भंक्तगणासह  पदायात्रेस  सुरुवात झाली बस  स्थानकावर नांदुरी रिक्षा चालक मालक संघटनेने पद यात्रेचे स्वागत केले हि यात्रा भुसावळ , साकेगाव , जळगाव , एरंडोल ,  धुळे , सैदाणे , मालेगाव भंगुरफाटा  ते नांदूरी गड अशी मुक्काम करीत जाणार आसुन दि ८/१२/२०२२ गुरुवार रोजी पोहचून मातेच्या मंदिरात महापुजा, आरती व भंडारा होऊन दिंडी यात्रा समाप्त होईल.

यंदा ही यात्रा अविनाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कछराम देवघाटोळे, सोपान ठोके, योगेश चौधरी, अनिल चौधरी, विनोद चौधरी, भानुदास चौधरी, संजय चौधरी, दयाराम चौधरी, नरेंद्र चौधरी, लक्ष्मण माळी, सुरेश चौधरी, प्रंशात चौधरी, प्रविण चौधरी आदींच्या सहकार्यांनी दिंडीचे आयोजन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.