सांगली :- कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सोमवारी सकाळी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका खोलीत एमडी ड्रग्जचा सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा सव्वाशे किलोचा साठा मुंबई गुन्हे शाखेने हस्तगत केला.
.कुपवाड येथील ड्रग्ज साठ्यावर २१ फेब्रुवारी रोजी पुणे गुन्हे शाखा आणि सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापेमारी केली. याठिकाणी पोलिसांनी तब्बल १४०किलो एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जचा साठा हस्तगत केला होता. त्याची किंमत तीनशे कोटी रुपये एवढी होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते.
कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सोमवारी सकाळी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने एका ठिकाणी ही धडक कारवाई केली. गावाच्या बाहेर हे ठिकाण असल्याने तेथे फारशी वर्दळ नाही. तेथे बांधण्यात आलेल्या एका खोलीत एमडी ड्रग्जचा सुमारे शंभर किलोचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. येथेच ड्रग्ज निर्मिती होत असल्याची पोलिसांची माहिती असल्याने त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे.