सामाजिक संशोधनातूनच समाजाचा विकास शक्य – प्रा. बी. व्ही. पवार

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील सामाजिकशास्त्रे प्रशाळा व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन प्रकल्प सादरीकरण’ या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. २७ व २८ फेब्रु. रोजी करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव चे माजी प्र-कुलगुरू मा. प्रा. बी. व्ही. पवार, विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक मा. प्रा. सुनील बी. कुलकर्णी, कार्यशाळा समन्वयक डॉ. प्रशांत व्ही. सोनवणे व प्रशाळेचे कार्यक्रम समन्वयक सहा. प्रा. समाधान कुंभार उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मा. बी. व्ही. पवार यांनी नमूद केले की, येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरण-२०२० हे विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा व कला शाखा या शाखेतील संशोधक हे बहुशाखीय दृष्टीकोनातून संशोधन करू शकतात. म्हणून कोणत्याच शाखेतील संशोधन हे दुय्यम किंवा कमी लेखले जाणार नाही असे सांगितले.

पहिले सत्र डॉ. जुगलकिशोर दुबे, इतिहास विभाग, मू. जे. महाविद्यालय हे ‘सामाजिक संशोधन- संधी आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या सत्रात डॉ. मनिषा व्ही. इंदाणी हे ‘संशोधन आराखडा’ या विषयावर मार्दर्शन केले. तसेच तिसऱ्या सत्रात डॉ. सागर एल. बडगे, समाजशास्त्र विभाग, मू. जे. महाविद्यालय, जळगाव. हे ‘संशोधन आणि सिद्धांत’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच चौथ्या सत्रात डॉ. उमेश गोगाडीया यांच्या अध्यक्षतेखाली सहभागींसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यात नवसंशोधाकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.