NEET PG परीक्षा आता होणार वेळेवर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वैद्यकीय महाविद्यालयाच्या पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NEET PG परीक्षा आता वेळेवर होणार आहे. NEET PG 2023 पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. NEET PG 2023 साठी सुमारे 2.09 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ५ मार्च २०२३ NEET PG 2023 ची प्रवेश परीक्षा वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे.

यंदा ही परीक्षा 5 मार्च रोजी होणार आहे. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा मंडळ म्हणजेच NBE द्वारे घेतली जाते. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते. NEET PG 2023 ची परीक्षा 5 मार्च रोजी होणार आहे. मात्र ही परीक्षा 2-3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.