महापालिकेत मराठी भाषा दिवस साजरा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक, नाटककार -वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो.

आज दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मराठी भाषा गौरव दिन म्हणून कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती दिपाली पाटील यांनी मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज )यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली.

आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी सांगितले की, वि वा शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक,नाटककार त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले आहे त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो.”अमृताशी ही पैजा जिंकेल “अशी आपली मराठी भाषा. ज्ञानेश्वरांनी रुजविलेले मराठीचे बीज येथे रुजले , वाढले. त्याचा वटवृक्ष झाला.रस आणि माधुर्याने परिपूर्ण,शब्द विलासाने नटलेली, विविध बोलीचे लेणे लेवून आलेली,साहित्यिकांच्या लेखणीने समृद्ध केलेली मराठी भाषा हा आपल्या सर्वांचाच मानबिंदू आहे.मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृद्ध करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा आपल्यासाठी गौरव दिन. यावेळी मनपा उपायुक्त गणेश चाटे, सहा. आयुक्त उदय पाटील,सुनील गोराणे तसेच सर्व विभाग प्रमुख/ कर्मचारी वर्ग आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.