मातृभाषेचा दर्जा प्रत्येकाने स्वतः समृद्ध करावा: डॉ प्रा.निलेश जोशी

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी भाषा सर्व भाषांची जननी आहे तिचा प्रत्येक शब्द हा मुळातच समृद्ध असल्याने तिच्यातला गोडवा आणि आपलेपणा हा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे.
जगाच्या पाठीवर जसे इंग्रजी भाषेतील संभाषण जरुरीचे आहे त्याचप्रमाणे मराठी भाषेतील संभाषण हे सुद्धा आज गरजेचे आहे असे विचार प्रा. डॉ. निलेश जोशी यांनी केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात मांडले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित होते.
डॉ. जोशी पुढे बोलताना म्हटले की, मराठी भाषेतील अनेक कवी आणि लेखक यांनी ग्रंथ, कादंबरी,कवितासंग्रह असे प्रगल्भ लिखाण केले आहे. मराठी भाषेला समृद्ध दर्जा त्यांनी मिळवून दिला आहे तुम्ही सर्व भावी शिक्षक असल्याने तुम्हाला या भाषेची जाण असणे तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादात म्हटले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य राणे यांनी भावी शिक्षक हा चौरंगी चिरा आहे भाषा ही आपल्याला जगण्याचे सामर्थ्य देते. उत्साह निर्माण करते त्यामुळे आपल्याला मातृभाषेविषयी अभिमान असावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्वाती चव्हाण यांनी केले.
यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.