गोदावरी फाऊंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज दिनांक १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आईसाहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी जिजाऊ आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे स्मरण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.