भरगर्दीत सलमानने महिलेला केलं Kiss; व्हिडीओ होतोय व्हायरल

0

गोवा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर 3’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान  नुकताच सलमान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (IFFI 2023) मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यामध्ये पोहोचला होता.  यादरम्यान सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गोव्यात सुरु असलेल्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ सलमान खानने हजेरी लावली. यावेळी सलमानला पाहण्यासाठी कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. पण याच गर्दीत सलमानने एका मुलीसोबत केलेल्या कृतीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. सलमान खान एका महिलेकडे गेला आणि अचानक तिचे चुंबन घेतले.

https://x.com/Freak4Salman/status/1726956781681971337?s=20

 

सलमान खानही आपल्या भाचीला प्रोत्साहन देण्यासाठी फरेच्या प्रीमियरला पोहोचला. IFFI 2023 मध्ये त्याची नजर गर्दीत एका महिलेवर पडली. सलमान  लगेच तिच्या जवळ गेला आणि हसत हसत त्या महिलेच्या कपाळावर किस केलं. या कार्यक्रमात सलमान खानला हे करताना पाहून सगळेच थक्क झाले.

 

सलमान खानने ज्या महिलेला किस केले ती ज्येष्ठ पत्रकार आणि अभिनेत्याची चांगली मैत्रीण आहे. पापाराझींनी IFFI 2023 मधील सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.