कारची डिव्हायडरला धडक, दोघांचा मृत्यू

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पारोळा तालुक्यातील कन्हरे फाट्यानजिक आर्टिका गाडीने डिव्हायरला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचे पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाले.

अहमदाबाद येथून भुसावळसाठी  जाणाऱ्या आर्टिका कारला कन्हेरे फाट्याजवळ अपघात झाला. त्यात चेतन सिंग भगतसिंग राजपुत (वय २७, रा. भानपुरा आनंद गुजरात), अजय नरेंद्र कोकणे (वय ६२, रा. फळेगंज वडोदरा गुजरात) यांच्यासह तीन ते चार जण हे या आर्टीका गाडीत भुसावळकडे जात असताना  गाडी डिव्हायडरवर धडकल्याने अपघात झाला.

त्यात चेतन सिंग भगतसिंग राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला तर अजय नरेंद्र कोकणे यांचा उपचारादरम्यान पारोळा येथील कुटीर रूणालयात निधन झाले.   घटनास्थळी पारोळा पो. नि. सुनील पवार, पो. उ.नि. राजू जाधव, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, इक्बाल शेख, राहुल कोळी, चालक अनिल वाघ यांनी भेट दिली. तर जखमींना रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकुर, यश ठाकुर, अमोल महाजन, शरद पाटील, यश गोसावी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.