Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»साकरे आग पिडीतांना मोदी आवास योजनेत घरकुल देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    साकरे आग पिडीतांना मोदी आवास योजनेत घरकुल देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2023Updated:December 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    धरणगाव तालुक्यातील साकरे गावात आगीमुळे घर व मालमत्तांचे नुकसान झालेल्या चारही कुटुंबास शासनाच्या मोदी आवास योजनेतून घरकुल देण्यात येतील. अशी ग्वाही  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. शासन या पिडीत कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज साकरे गावात भेट देत आग पिडीत कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रूपयांची मदत केली. तसेच प्रत्येकाला गॅस, शेगड्या, तीन महिन्यांचा किराणा, भांड्यांचा संच, गहू व तांदूळ, साड्या व वस्त्रांच्या रूपाने पालकमंत्र्यांनी या कुटुंबास तात्काळ मदतीचा हात देत त्यांच्या दु:खावर फुंकर घातली. पालकमंत्र्यांची भेट घेतल्यावर पिडीत तिरूणाबाई पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला.

    याप्रसंगी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पिडितांना आठ दिवसांच्या आत मोदी आवास योजनेतून  घरकुल प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी उपस्थित होते.

    साकरे गावात १८ डिसेंबर रात्री ४ घरांना भीषण आग लागल्याची घटना रात्री १ वाजता घडली होती. या लागलेल्या आगीत रमेश‌ वना पाटील, वना सुकदेव पाटील, स्वप्निल अमृतकर आणि तिरुणाबाई वना पाटील यांच्या घरातील कापूस, पैसे व ऐवज जळून खाक झाले असून लाखांचे नुकसान झाले.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पिडित कुटुंबाच्या आग लागलेल्या घरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी साकरे गावातील सरपंच श्रीकांत पाटील, पोलीस पाटील घन:श्याम पाटील, पदाधिकारी निलेश पाटील, सरिता कोल्हे – माळी, डी. ओ. पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, मोतीआप्पा पाटील, जगतराव पाटील, नवल पाटील, आसोदेकर तुषार महाजन, पुष्पा पाटील, रिया इंगळे, प्रियंका कोळी आदी उपस्थित होते. यावेळी साकरे ग्रामस्थ, तरूण व महिला उपस्थित होते.

    #jimaka Guardian Minister and Water Supply Minister Gulabrao Patil jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif