सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन…

0

 

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय खामगाव जि. बुलढाणा यांचे मार्फत ठिय्या आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर टॉवर चौक येथे दिनांक 8 सप्टेंबर 2023 ते दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आम्ही सकल मराठा समाज बांधव अतिशय शांततेने कायदेशिर रित्या आंदोलन करुन मराठा समाज आरक्षणाची व जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणा करिता आंदोलन करीत असलेल्या मराठा समाज आंदोलकावर लाठी चार्ज केलेल्या घटनेचा निषेध करून या घटनेतील आंदोलकांवर लाठी चार्ज करणार्‍या अधिकार्‍यावर कायदेशिर कारवाई ची मागणी करीत आहोत. सोबतच मनोज पाटिल जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्याकरिता आम्ही हे आंदोलन करीत आहोत. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालया समोर टावर चौक येथे सुरु असलेल्या ठीया आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष,  मंडळ यांच्या कडून सकारात्मक पाठींबा मिळाला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही योग्य असून सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण दयावे, यासाठी सर्व सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष तसेच मंडळ यांनी जाहिर पाठींबा दिला आहे.

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे विविध स्तरावर सुरुच राहणार आहे. त्यातील भाग म्हणून दि. 13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी बुलढाणा येथे जिल्हा पातळीवर भव्य मोर्चाचे आयोजन आमच्या समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. आता सरकारने मराठा समाजाला ठोस असे आरक्षण द्यावे जे कायद्याने सशक्त व मजबूत राहील अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मराठा समाजाने संपूर्ण आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत केले असून जर समाजाची मागणी पूर्ण न झाल्यास या आंदोलनाला उग्र स्वरुप येऊ शकते आणि या सर्व बाबीस सरकार जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातनू सकल मराठा समाज खामगांव च्या वतीने देण्यात आला. त्याच प्रमाणे दि. 13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी बुलढाणा येथे भव्य मोर्चाचे आयोजन सकल मराठा समाजाचे वतीने करण्यात आले असून, या मोर्चाला सकल मराठा समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. निवेदन देतेवेळी सकल मराठा समाज बांधव, व विविध मराठा समाज संघटना, तसेच विविध राजकीय पक्ष व समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.