क्रीडा संघटनांच्या २१ मागण्याची पूर्तता करणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे क्रीडा संघटनांना आश्वासन

0

जळगाव ;- जिल्हा एकविध क्रीडा संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून भौतिक सुविधा, आर्थिक अनुदान व विविध समस्येबाबत वाद उद्भवला असून त्याबाबत क्रीडा संघटना या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार व तोंडी स्वरूपात चर्चा करीत असल्याचे वृत्त माननीय जिल्हाधिकारी यांनी वर्तमानपत्रात द्वारे वाचून त्वरित क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी एक वाजता त्यांच्या दालनात बोलवली होती .

क्रीडा संघटना तर्फे क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजीआमदार चंद्रकांत सोनवणे, सचिव डॉक्टर प्रदीप तलवलकर, उपाध्यक्ष श्याम कोकटा, सहसचिव फारूक शेख व राजेश जाधव, संचालक नितीन बरडे, दिलीप गवळी, प्रवीण ठाकरे व रवींद्र धर्माधिकारी यांची उपस्थिती होती*. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांना निरोप न मिळाल्याने त्यांची अनुपस्थिती होती. निवासी उप जिल्हधिकारी सोपान कासार हे सुध्दा बैठकीत उपस्थित होते.

क्रीडा कार्यालय बाबत १० तक्रारी
१९२०-२१ पासून शालेय स्पर्धा आयोजनाचे पैसे संघटनेला मिळाले नाही, दरवर्षी क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दहा लाख रुपये क्रीडा साहित्यासाठी मिळतात ते आज पर्यंत वाटण्यात आलेले नाही, वैयक्तिक म्हणजे ॲथलेटिक्स खेळाचे साहित्य खरेदी केले गेले नाही, उंच उडी ची मॅट दुरुस्त केली नाही, शालेय क्रीडा स्पर्धाचे प्रमाणपत्र वेळीच दिले जात नाही, क्रीडा स्पर्धेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नाही, कार्यालयातील मनुष्यबळाच्या अभावामुळे स्पर्धा आयोजनात अडथळे निर्माण होत आहे, शालेय क्रीडा स्पर्धेचे पंचांचे मानधन १५० वरून ५०० रुपये अहमदनगरच्या धर्तीवर करण्यात यावे, जिल्हा क्रीडा पुरस्कार शासनाच्या परिपत्रकानुसार नियमित देण्यात यावा,५ टक्के खेळाडूंच्या नोकरीसाठी आरक्षण संबंधी तसेच दहावी व बारावी शालेय विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेड गुण ग्रेड बाबत आवश्यक असलेले रेकॉर्ड त्वरित वरिष्ठ कार्यालयाला पाठवणे आवश्यक आहे.

जिल्हा क्रीडा संकुल बाबत अकरा तक्रारी

२००७ पासून संकुलातील कोणत्याही मैदानाची देखभाल करण्यात आलेली नाही, ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, जलतरण तलाव याची खोली, संकुलातील ४० रूम मधील झालेली दुर्दशा, संकुलात संघटनांसाठी १७ कार्यालय असताना सुद्धा ते आज पर्यंत संघटनांना दिले गेले नाही, संकुलातील विविध मैदाने संघटनेला जिल्हा, राज्य, अथवा राष्ट्रीय स्पर्धेसाठी देताना जो दर आकारला जातो तो जास्त असून त्याला त्वरीत कमी करण्यात यावे., बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, संकुला बाहेरील ए ते डी विंग चे कॉंक्रिटीकरणाचा ठराव पास होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही ती त्वरित करण्यात यावी, पायका अंतर्गत प्राप्त क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलेले नाही ते त्वरित वाटप करावे, क्रीडा संकुल हे संघटनेच्या खेळाडूंसाठी रोजच्या सरावासाठी नाममात्र दराने देण्यात यावे, क्रीडा संकुल समितीवर तीन अशासकीय सभासद म्हनुण खेळाडूंची निवड करण्यात यावी असे आदेश असताना सुद्धा ती केली गेली नाही ती त्वरित करण्यात यावी व पोलीस भरतीसाठी संकुलातील मैदानाचा अतिरिक्त वापर होत असल्याने त्याला बंद करावे अथवा त्यांच्यावर निर्बंध घालण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सकारात्मक उत्तरे
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव चे अध्यक्ष व क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष असल्याने त्यांनी प्रत्येक समस्येबाबत सविस्तर चर्चा केली व याप्रकरणी क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक यांच्यासह क्रीडा संघटनांची बैठक घेऊन सर्व विषयी मार्गी लावू असे आश्वासन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांचा संघटनातर्फे स्वागत
क्रीडा संघटनाच्या महासंघातर्फे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नंतर चर्चा करू त्यांना ते निवेदन देण्यात आले.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.