सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणचा ‘एक खिडकी’ उपक्रम

0

जळगाव;;- जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडलात सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी महावितरणतर्फे ‘एक खिडकी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तात्पुरती जोडणी पासून विजेसंबंधीच्या सर्व सोयी-सुविधांच्या पुर्ततेसाठी या ‘एक खिडकी’ उपक्रमाचा फ़ायदा गणेश मंडळांना होणार आहे. उपविभागीय कार्यालयात ही एक खिडकीची सोय उपलब्ध असणार असून याचा गणेश मंडळांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी केले आहे.

प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक खिडकीचा उपक्रम दि.11 सप्टेंबर 2023 पासून सुरु करुन सर्व गणेश मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी सहकार्य करण्याच्या सुचना मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी महावितरण यंत्रणेस दिलेल्या आहेत. गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या जोडण्या या तापुरत्या स्वरुपाच्या असणार असून त्यासाठी घरगूती वर्गवातील वीज दर असणार आहेत. मान्यताप्राप्त व नोंदणीकृत कंत्राटदांकडूनच अधिकाधिक गणेश मंडळांनी अधिकृत जोडण्या घ्याव्यात. वीज जोडणी घेत असतांना वीज सुरक्षेचे सर्व नियम पाळून सुरळीत व सुरक्षित पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा, असेही आवाहन मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी गणेश मंडळांना केले आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.