जागतिक लोकशाही दिनानिमित्त दै. लोकशाहीचे राजेश यावलकर यांनी सह्याद्री वाहिनीवर साधला संवाद

0

(पहा याचे प्रक्षेपण )
जळगाव /मुंबई ;- जागतिक लोकशाही दिन हा १५ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा करण्यात येतो . त्यानिमित्त मुंबईच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हॅलो सह्याद्री वर जळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकशाहीचे संचालक संपादक राजेश यावलकर यांनी संवाद साधला . त्यांनी जागतिक लोकशाही दिन आणि दूरदर्शनच्या  वर्धापनदिनानिमित्त रसिक प्रेक्षकांच्या प्रश्नांचीही उत्तरे देऊन संवाद साधला . सह्याद्री वाहिनीचे सुबोध रणशिवरे यांनी राजेश यावलकर यांची प्रकट मुलाखत घेतली .

जागतिक लोकशाही दिनानिमित्त राजेश यावलकर यांनी लोकशाही दिन आणि त्यांचे महत्व या विषयावर मुद्देसूदपणे संवाद साधून प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. श्री. यावलकर यांनी जागतिक लोकशाही दिनानिमित्त अनेक विषयांना संर्मपकपणे उत्तरे दिली . या कार्यक्रमाचे आज रात्री ११ वाजता आणि उद्या सकाळी ९ वाजता पुनर्प्रक्षेपण होणार असून प्रेक्षकांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.