कल्याणमध्ये आरपीएफ अधिकाऱ्याची हत्या !

0

कल्याण , लोकशाही न्यूज नेटवर्क
पगारवाढ रोखल्याच्या कारणातून आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे. हत्या करणाऱ्या आरपीएफ जवाना पंकज यादवाला काेळसेवाडी पाेलिसांनी पेण येथून अटक केली आहे. त्याच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज यादव आणि बसवराज गर्ग दोघेही २०१० साली एकत्र काम करत होते. पंकज यादव यांची बसवराज गर्ग यांनी विभागीय चौकशी केली होती, त्यात पंकज यादव यांची ४ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. त्यामुळे ४ वर्षांपासून बसवराज गर्ग यांच्याविरोधात संतप्त होता. पंकज यादवची सध्याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. याच रागातून पंकज यादव बुधवारी (८ फेब्रुवारी) दुपारी ३.३० वाजता पेणहून कल्याणला आला. बसवराज यांची संपूर्ण माहिती घेतली.

रात्री पावणेदहाच्या सुमारास उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे कल्याणच्या बॅरेक रूममध्ये कानात इअरफोन लावून गाणी ऐकत असताना आरोपी पंकज यादव याने बॅरेकमध्ये जाऊन बसवराज गर्ग यांच्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गर्गचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने पळ काढला आणि रोहा गाठला. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनीपोलिसांनी तपास करुन संशयित आरोपी पंकज यादव याला अटक केली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.