शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या संपत्तीचे वाटप ; यांना मिळाला हिस्सा

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रिकेट विश्वातील महान लेग स्पिन गोलंदाज शेन वॉर्नचा गेल्या वर्षी थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता शेन वॉर्नचे मृत्यूपत्र समोर आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, वॉर्नने आपल्या मृत्युपत्रात माजी पत्नी सिमोन कॅलाघनला एक पैसाही दिलेला नाही. बराच काळ तो इंग्लिश अभिनेत्री लिझ हर्लीला डेट करत होता. वॉर्ननेही त्याच्या मृत्यूपत्रात हर्लेला काहीही दिलेले नाही.

शेन वॉर्नने त्याच्या मालमत्तेतील बहुतेक हिस्सा हा त्याच्या मुलांना दिला आहे. शेन वॉर्नला एकूण तीन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव जॅक्सन वॉर्न आहे तर दोन मुलींची नावे समर वॉर्न आणि ब्रुक वॉर्न आहेत. या तिघांनाही माजी फिरकीपटूने मृत्यूपत्रात समान ३१ टक्के वाटा दिला आहे.

मृत्यूपत्रात वॉर्नने आपल्या मुलांसोबतच त्याच्या भावाच्या मुलांवरही वर्षाव केला आहे. उर्वरित सात टक्के मालमत्तेपैकी वॉर्नने २ टक्के मालमत्ता भाऊ जेसनला दिली. याशिवाय वॉर्नने जेसनच्या दोन मुलांच्या नावे २.५ टक्के मालमत्ता ठेवली आहे. त्याची BMW, मर्सिडीज बेंझ आणि $375,500 किमतीची यामाहा मोटारसायकल त्याचा मुलगा जॅक्सनला देण्यात आली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.