रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे पालक शिक्षक सभा उत्साहात

0

जळगांव :– रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे पालक शिक्षक संघाची सभा ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती . या सभेसाठी उप वन संरक्षक अधिकारी ( I.F.S ) जमीर एम . शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते .

पुणे येथील शिरूर तालुक्यातील रहिवासी असणारे जमीर शेख हे 8 वर्षाच्या अवघड परिस्थितीतून परिश्रम करून २०१८ मध्ये IFS पदी UPSC परीक्षा पास करून आज जळगाव येथे DCF म्हणून कार्यभार सांभाळत आहेत .आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी त्यांचा जीवनप्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला . इ . ८वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची पद्धत सांगितली . स्वतःच्या संघर्षाची कहाणी सांगताना दिलेल्या परीक्षांचे स्वरूप कसे असते?काय – काय शिक्षण घ्यावे लागते? नैराश्य कसे झटकावे आणि पुन्हा नव्याने जोमाने अभ्यासात लागावे यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले . याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी आणि पालक मंत्रमुग्ध होऊन त्यांचे मनोगत ऐकत होते . विद्यार्थ्यांनी शेवटी आपल्या अडचणी विचारताच जमीर यांनी शंकांचे निरसन होईपर्यंत उत्तरे देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेरणेने सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि आलेल्या परिस्थितीला झेलण्यासाठी मानसिक ध्येय महत्त्वाचे असते हा संदेश दिला . सदर संवादात्मक स्वरूपाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना पुढे दिशा दाखविणारा ठरेल अशी अपेक्षा संस्थेच्या अध्यक्षा रोजमिन खिमाणी प्रधान यांनी व्यक्त केली . अशा प्रकारे पालक सभा यशस्वीरित्या झाली .

Leave A Reply

Your email address will not be published.