वाघोदा शिवारातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

0

रावेर :- रावेर तालुक्यातील वाघोदा बु येथे अतुल प्रभाकर वाघ (22) या तरुणाचा शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. गोपाल नथ्थू पाटील यांची शेत गट क्रमांक 743 मध्ये विहिर असून बुधवारी अतुल वाघ या तरुणाचा विहिरीतील पाण्यात तरंगताना मृतदेह आढळला.

याप्रकरणी सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजीव चौधरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.