रोझलँड शाळेत पद्मश्री ना.धो.महानोर यांना श्रद्धांजली…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोझलँड मराठी मिडीयम स्कूलतर्फे कविवर्य ना. धों. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मौन पाळून विद्यार्थ्यांनी ना. धों. महानोर यांच्या कवितांचे वाचन करून श्रद्धांजली वाहिली. तसेच शिक्षकांनी रानकविंबद्दल माहिती देऊन काव्य सादरीकरण केले, आणि विद्यार्थ्यांना स्वरचित कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले.

याप्रसंगी शाळेने आंतरशालेय रानकवी महोत्सव 2023 आयोजित करण्याचे निश्चित केले. या महोत्सवात 16 सप्टेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत काव्यवाचन घेण्यात येईल. दरम्यान जळगांव मधील इतर शाळांना यावेळी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात करण्यात आले. सदर महोत्सवाचे माहितीपत्रक लवकरच सर्व शाळांना देण्यात येईल. असेही यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.