महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड लंपास

0

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क
एका महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड असा एकूण २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची अमळनेर बसस्थानक परिसरात उघडकीस आली असून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जयश्री निलेश सूर्यवंशी (वय-२६) रा. देहू ता. जि. पुणे ह. मु. शिरुड ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जयश्री सुर्यवंशी या महिला कल्याण ते रावेर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९३०) ने अमळनेर शहरात आल्या होता. बसमधून उतरत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून २५ हजाराचा सोन्याच नेकलेस आणि दीड हजाराची रोकड असा एकुण २६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु काही मिळाले नाही. अमहिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.