विद्यापीठात ‘ डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या ‘ विषयावर 9 रोजी परिसंवाद

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात ‘ डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या ‘ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात येणार असून तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील उपस्थित रहाणार आहेत. उद्घाटनानंतर ‘ डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या ‘ या विषयावर होणाज्या परिसंवाद सत्राच्या अध्यक्षस्थानी मल्टीमीडिया फिचर्स प्रा.लि. चे सीईओ सुशील नवाल उपस्थित राहतील. यावेळी वक्ते म्हणून दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने, लोकमतचे संपादक रवी टाले, दिव्य मराठीचे संपादक दिपक पटवे, लोकशाहीचे संचालक संपादक राजेश यावलकर, साईमतचे संपादक प्रमोद ब-हाटे, तरुण भारतचे संपादक चंद्रशेखर जोशी, सकाळचे आवृत्ती प्रमुख सचिन जोशी, लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील, देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख मनोज बारी, जनशक्तीचे संपादक त्र्यंबक कापडे, पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे सहभागी होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर, सहायक प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.रोहित कसबे यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.