हॉटेलमधून रोकडसह १ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास; वेटरवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील गणेश कॉलनीत खॉजामियॉ चौकातील हॉटेल गायत्री येथील वेटरने हॉटेमधील लॉकर फोडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद प्रकाश पवार (वय २९, रा. शाहूनगर नुरानी मशिदीसमोर जळगाव) यांचे गणेश कॉलनीतील खाजमिया चौकात हॉटेल जयश्री नावाचे हॉटेल आहे. हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हॉटेलमध्ये ओम निलेश्वर चतुर्वेदी (वय २१, रा. सतना मध्य प्रदेश, ह.मु. गणेश कॉलनी जळगाव) हा वेटर म्हणून कामाला आहे.

१७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान वेटर ओम चतुर्वेदी याने हॉटेलच्या केबिनमधील लॉकर तोडून १ लाख ५ हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे. याबाबत शरद पवार यांनी शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून वेटर ओम निलेश्वर चतुर्वेदी याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.