लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापूर – नितेश राणेंना पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले. आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग मधील ओरोस इथल्या सरकारी हॉस्पिटल कडे पाठवण्यात आला आहे. आमदार नितेश राणे हे गेल्या चार दिवसापासून सीपीआर हॉस्पिटल मधील कार्डियाक विभागांमध्ये उपचार घेत होते.
यावेळी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांना उच्च रक्तदाब आणि उलट्यांचा त्रास झाला होता. मात्र त्यांची प्रकृती आज स्थिर असल्याने त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ओरस इथल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आला आहे.
सकाळी दहा वाजून 15 मिनिटांनी सरकारी ऍम्ब्युलन्स मधू मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना फोंडा घाट मार्गे रवाना करण्यात आला आहे. त्यांच्यावरील पुढील उपचार हे ओरस इथल्या सरकारी रुग्णालयात होणार आहे.