अखेर महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटला; मागण्या तत्वता मान्य

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

५ एप्रिल पासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप होता. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वता मान्य करण्यात आल्याने हा संप अखेर मिटला.

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या या आर्थिक तरतूद, वेतनवाढ वा अन्य आर्थिक कारणामुळे नसून तांत्रिक स्वरूपातील होत्या. यात बहुतांश कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नतीसह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता संदर्भात होत्या. बरेचसे कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र असूनही पदोन्नती न मिळताच सेवानिवृत्त देखील झाले होते.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर गेल्या पाच महिन्यापूर्वीच बैठक घेण्यात येऊन अनुकुलता देखील शासन स्तरावर होती. परंतु शासन निर्णय वा प्रशासकीय संकेत नसल्याकारणाने जिल्ह्यातील १५ तालुकास्तरावर तसेच उपविभागीय, तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.

दरम्यान बुधवार १३ एप्रिल रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सचिव डॉ. नितीन करीर यांच्या समवेत पदाधिकारी याची सकारात्मक चर्चा होऊन १० मे २०२१ च्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी मान्य करण्यात आल्या.

सोमवार १८ एप्रिल रोजी सर्वच कार्यालयात कर्मचारी उपस्थित झाले आहेत. महसूल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वचनानुसार संपकाळात सर्वसामन्यांची शेतकरी वर्गाची प्रलंबित कामे अधिक वेळ देऊन पूर्ण करण्याचेही कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.