लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यभरातील रेशन दुकानदार उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे. विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे. दरम्यान येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे. दरम्यान येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर असणार आहेत.
रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी देशपातळीवर ऑल इंडिया फेअर, प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे.
रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजर करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, मार्जिन मनी ३०० रुपये करा, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी करा. तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत. नव वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.