Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बस आणि दुचाकीची सामोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
    गुन्हे वार्ता

    बस आणि दुचाकीची सामोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 31, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. एसटी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ हि घटना घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

    सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील पिंपळे रोड भागातील वामन नगरातील रहिवासी प्रीतम गजमल शिंदे (वय ४९) हे ३० रोजी नेहमीप्रमाणे दुचाकीने शेतीच्या कामानिमित्त बोरगाव येथे जाण्यास निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ अमळनेर-तांदळी एसटी बसची (क्रमांक एमएच ४०-एन ९०८२) धडक बसल्याने डोक्यास,तोंडास मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुकुंदा शिंदे यांच्या फिर्यादीनुसार बसचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

    #crime accident Amaler jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif