मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क
याबाबत सविस्तर वृत्त असे, की खानापूर व परिसरामध्ये अवैध धंद्यांचा एकच सुळसुळाट सुरू आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या अवैध धंद्यांमध्ये सट्टा मटका पत्ता व अवैध दारू विक्री अशी अवैध धंदे जोरात सुरू असून तरुण पिढी वाम मार्गाला लागत आहे. तसेच खानापूर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेलगत असल्यामुळे मध्य प्रदेश मध्ये सध्या अवैध धंदे बंद असल्यामुळे तिकडील गुन्हेगार व व्यसनाधीन लोक सीमेवरील गावांचा सहारा घेऊन अवैध धंदे तसेच सट्टा मटका व पत्ता खेळण्यासाठी दररोज खानापूर गावात व परिसरात येत असतात. त्यामुळे परिसरामध्ये सराईत गुन्हेगारांचा सुद्धा वावर आहे. अशा लोकांजवळ अवैध हत्यारे सुद्धा असतात. त्यामुळे बाया बापड्या लहान मुले व शेतातील काम करणाऱ्या मजुरांना सुद्धा या गोष्टीची भीती वाटून असुरक्षित वाटत आहे. अशा आशयाचे निवेदन खानापूर व परिसरातील गावकऱ्यांनी रावेर पोलीस स्टेशनला दिलेले आहे. तसेच 30 डिसेंबर 23 पर्यंत परिसरातील अवैध धंदे बंद झाल्यास आमरण उपोषणाची तयारी सुद्धा असल्याची निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.