रेड हार्ट ईमोजी पाठवणे गुन्हा ?; ‘या’ देशानं बनवला कायदा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेक देशांमध्ये अजब कायदे बनवले जातात. त्यातच सौदी अरेबियाच्या कठोर कायद्यांबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र काही चुकीची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. सौदी अरेबियामध्ये जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी (Red Heart Emoji) पाठवण्याची चूक केली तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. तसेच, 20 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. एखाद्याला रेड हार्ट इमोजी पाठवणे हा गुन्हा मानला जातो.

सौदी अरेबियात आयटीचे कायदे अतिशय कडक आहेत. इथे एखाद्याला रेड हार्ट इमोजी पाठवणे हा छळाचा गुन्हा मानला जातो. इतकेच नाही तर, असे इमोजी जर कोणी एखाद्याला पाठवले आणि त्या व्यक्तीने त्याबद्दल तक्रार केली तर हा छळ गुन्ह्याच्या कक्षेतसुद्धा होतो. अशा गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. यामध्ये रेड हार्ट इमोजीचा संबंध लैंगिक गुन्ह्यांशी जोडण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, जर इमोजी ज्या व्यक्तीला पाठवले असेल आणि त्या व्यक्तीने जर तक्रार केली आणि एखाद्याचा अपराध सिद्ध झाला, तर पाठवणाऱ्याला 100,000 सौदी रियालपेक्षा जास्त दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर एकच व्यक्ती या कायद्याचे वारंवार उल्लंघन करत असेल तर त्याला 300,000 सौदी रियाल दंड किंवा पाच वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.