RBI ने केले नियम कडक, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आरबीयाने ठेवी घेणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नियम कडक केले आहे. या कंपन्या आता लोकांकडून फक्त 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीच ठेवी घेऊ शकणार आहे. यापूर्वी हा नियम 10 वर्षांसाठी होता. याबाबत 29 फेब्रुवारपर्यंत भागीदारांकडून सूचना मागविण्यात आल्या आहे.
हाउसिंग फायनान्स कंपन्यांना मार्च 2025 पर्यंत त्यांनी एकूण लिक्वीड मालमत्ता, मंजूर सिक्युरिटीजसह सार्वजनिक ठेवींच्या 13 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. असे आरबायने सोमवारी एका परिपत्रकात म्हंटले आहे. एचएफसी इतर प्रकारच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांप्रमाणेच ठेवी स्वीकारण्यासाठी समान नियमांचे पालन करतात.

1 एप्रिलपासून नियम लागू
बँक किंवा NBFC कडून घेतलेलं कर्ज चुकवल्यास दांडाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होतील. सोमवारी याबाबत माहिती देताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सांगितले की सुधारित कर्जाचे नियम लवकरच लागू केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.