दोन संघटनांच्या वादात रेमंड कामगारांची होरपळ..!

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगावत बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये रेमंड कंपनीचा (Raymond Company) समावेश आहे. गेल्या दोन तपा पेक्षा जास्त कालावधी पासून रेमंड कंपनी जळगाव (Jalgaon) येथील युनिटमध्ये निर्मिती सुरू आहे. या कंपनीत सध्य: स्थितीला ९७५ कायमस्वरूपी कामगार आहेत. कोरोनाच्या दोन अडीच वर्षाच्या भयावह कालावधीनंतरसुद्धा रेमंड कंपनीने आपले उत्पादन सुरू ठेवले आणि जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी कंपनीतील कामगारांच्या पगार वाढीचा करार झाला. त्याआधी कामगारांनी १० डिसेंबर ते १२ डिसेंबर असा केलेला पगार वाढीच्या करारासंदर्भात मागे घेण्यात आला. दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रेमंड कंपनीतील अधिकृत कामगार संघटना कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांनी कंपनीकडून करण्यात आलेल्या कराराचे फायदे कामगारांना समजावून सांगितले. हमी पत्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी कामगारांना दिले. खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेला कामगार उत्कर्ष सभा अध्यक्ष यांची ही कृती म्हणजे कराराचे सर्व श्रेय जितेंद्र जोशी यांना मिळते. ही बाब खानदेश कामगार उत्कृष्ट संघटनेला खटकली असावी, म्हणून अध्यक्ष ललित कोल्हे (Lalit Kolhe ) यांनी आपल्या युनियनच्या माध्यमातून रेमंड कंपनीवर दबाव टाकण्यासाठी २४ फेब्रुवारी २०२३ पासून काम बंद आंदोलन पुकारले. सदरचे काम बंद आंदोलन हे औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचे आदेश दिले.

आधीच बेकारीने राज्यात आणि देशात कहर माजावीला असताना एकदम बेमुदत काम बंद आंदोलन करणे हे कामगारांच्या हिताचे नाही, याची जाणीव कामगार नेत्यांना असणे आवश्यक आहे. १२५ ते १३० कामगार हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास कंपनीत गेले असताना त्यांच्यावर गुंडगिरी पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यानंतर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यानंतर अशा कामगारांना कंपनीत येण्याचा मज्जाव कंपनी व्यवस्थापनाने केला. त्यानंतरही काही कामगारांनी कंपनी कार्यालयात जाऊन बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कंपनीतर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि कंपनी पासून ५० मीटर परिसरात १४४ कलम लागू केला. प्रांताधिकार्‍यांनी हा आदेश काढला तेव्हा कंपनी परिसरात घोषणाबाजी आंदोलन करणाऱ्या खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष ललित कोल्हे यांच्यासह सात ते आठ जणांवर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेतर्फे औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. तेव्हा रेमंड कंपनीच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिला. त्यामुळे कामगारांच्या आंदोलनातील हवा निघून गेली. आता रेमंडच्या कामगार आंदोलनाला पोलिसांच्या जमावबंदीच्या आदेशाचे पालन करावे लागेल. दरम्यान आतापर्यंत १२ कामगारांणा रेमंड कंपनीने निलंबित करण्याचे आदेश पारित करून आक्रमक भूमिका घेतली आहे.

गेल्या दोन तपापासून जळगावत रेमंड कंपनीचे शांततापूर्ण रीतीने कामकाज चालू असताना अचानक कामगार आंदोलनाने गालबोट लागले आहे. आता खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष असलेल्या ललित कोल्हेंच्यापूर्वी त्यांचे सक्के काका कै. दिलीप कोल्हे या संघटनेचे व्यवस्थापक अध्यक्ष होते. दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात अत्यंत चांगले सौहार्दाचे वातावरण होते. त्यांच्या निधनानंतर ललित कोल्हे यांनी या संघटनेला ताबा घेतला आणि त्याला वेगळे वळण लागले. अधिकृत कामगार संघटना असलेल्या उत्कर्ष कामगार सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांचेवर ललित कोल्ह्यांकडून आरोप केला जातो की, ‘जितेंद्र जोशी मागच्या दाराने संघटनेत प्रवेश करून आपले वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत’. ललित कोल्हे यांना जितेंद्र जोशींचे वर्चस्व सहन होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु त्यासाठी कामगारांना वेठीस धरणे हे कितपत योग्य आहे? अलीकडे कुठल्याही व्यवसाय अथवा उद्योग सुरू करणे हे अत्यंत जिंकलीचे बनले आहे. तेव्हा सर्व बाजूंनी विचार करून आज ९७५ कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. कंपनीला न परवडणाऱ्या गोष्टी करण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. कंपनीदर तोट्यात जात असेल तर कंपनी मालक घाट्यात व्यवसाय करू शकत नाही.

ललित कोल्हे यांना घराण्याचा राजकीय वारसा आहे. त्यांनी स्वतः जळगाव महानगरपालिकेचे महापौर म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ते चांगले लोकप्रतिनिधी आहेत. तेव्हा कामगारांच्या हितासाठी लढत असताना सामंजस्याची भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. कारण जळगाव मध्ये कामगार संघटनेच्या व इतर जाचाला कंटाळून येऊन घातलेली स्टॅंडर्ड मिलने जळगाव ऐवजी दुसरे स्थान निवडले. त्यामुळे हजारो कामगारांना स्टॅंडर्ड मिलमध्ये काम करणाऱ्यापासून वंचित रहावे लागले, हा इतिहास आहे. जळगाव मधील एमआयडीसी मध्ये उद्योजक यायला खुश नाहीत हा ठपका ठेवला जातो. तो पुसून काढायचा असेल तर जळगाव कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, असे चित्र निर्माण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी असलेल्या ललित कोल्हे यांच्यावर आहे. त्यामुळे रेमंड कंपनीतील कामगार आंदोलन चिघळण्यापूर्वीच मध्यस्थीने ते प्रश्न मिटवावेत असे आम्हाला वाटते…!

Leave A Reply

Your email address will not be published.