टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा पुन्हा फॉर्मात

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडियाचा (India) ऑलराउंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने शानदार एन्ट्री केली आहे. जडेजाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात कांगारुंना आपल्या खेळाने नाकी नऊ आणून सोडले. जडेजाने पहिल्या डावात 5 विकेट्स घेत अर्धी टीम माघारी पाठवली. तसेच जडेजाने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. जडेजाच्या या फिरकीच्या जादूवर ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला डाव हा 63.5 ओव्हरमध्ये 177 धावांवर आटोपला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. जडेजाने आपल्या एकूण 22 ओव्हरमध्ये 47 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने या 22 पैकी 8 ओव्हर मेडन टाकल्या.

जडेजाने मार्नल लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी या पाच जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 रन्सचं योगदान दिलं. विकेटकीपर एलेक्स कॅरीने 36 रन्स केल्या. तर पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा जोडल्या.

अश्विनच्या 450 विकेट्स

जडेजानंतर सर्वाधिक विकेट्स आर अश्विनने (R.Ashwin) घेतल्या. अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. अश्विनने एलेक्स कॅरीला आऊट करत मोठा कारनामा केला.अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अश्विन याने 89 व्या सामन्यात ही कामगिरी केली. अश्विन यासह टीम इंडियाकडून सर्वात कमी 89 सामन्यांमध्ये 450 विकेट्स घेतल्या. यासह अश्विनने 18 वर्षांपूर्वीचा टीम इंडियाच्या अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक केला. कुंबळे याने आजपासून 18 वर्षांपूर्वी 2005 मध्ये 93 सामन्यांमध्ये 450 विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Leave A Reply

Your email address will not be published.